शिवसेनेतून शिवसंग्राममध्ये आलेले जगन्नाथ काकडे म्हणाले अर्जून खोतकर श्रीमंतांचे नेते

Foto


औरंगाबाद- ज्या पक्षात हजार कोटींची संपत्ती असणारे नेते जिल्ह्याचे नेतृत्व करतात तिथे आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या मुलांची नेहमी हेटाळणी केली गेली अशी घणाघाती टीका युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे माजी कोअर कमिटी सदस्य जगन्नाथ काकडे यांनी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचे नाव न घेता केली आहे.

 

जगन्नाथ काकडे यांनी शिवसंग्राम मध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा भाष्य केले आहे. त्यांनी शिवसेना गरिबांचा नाही तर कोट्याधीश लोकांचा पक्ष आहे असा सणसणीत आरोप शिवसेनेवर केला आहे.

 

जालना जिल्ह्यातील शिवसेना आणि इतर पक्षांच्या घराणेशाहीचा ही त्यांनी यावेळी समाचार घेतला. शिवसेना हा गरिबांचा, भूमीपुत्रांचा पक्ष आहे हा माझा गैरसमज होता. जेव्हा युवासेनेचे पद वाटप करण्यासाठी औरंगाबाद ला आलो तेव्हा कळाले की इथे तर सर्व नेत्यांनीच मुले आहेत आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना तर रांगेत पण उभे राहू दिले जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

जालना जिल्ह्याखोतकर यांचा भाऊ किंवा मुलगा अध्यक्ष होतो किंवा दानवेंची मुलगी जिल्हापरिषद अध्यक्ष तर टोपेंचा भाऊ जिल्हापरिषदाचा अध्यक्ष होतो. याच घराणेशाहीला कंटाळून त्यामुळे मी शिवसेना सोडून शिवसंग्राम मध्ये आलो असल्याचे ते म्हणाले. शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते.